शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News: ज्या कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या; तोच कोरोना आता देतोय नोकरीच्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 12:38 AM

CoronaVirus Carrier opportunities: कोरोनामुळे संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलला आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडले. लॉकडाऊनच्या वर्षभराच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हजारो-लाखो बेरोजगार झाले. असे असले, तरी काही अंशी चांगलेही घडले. अनेक होतकरु तरुणांनी नव्या संधीही शोधल्या. संकटातून संधी निर्माण होऊ शकते.

- विजय सरवदेकोरोनामुळे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क निर्मितीसारखे स्टार्टअप उदयास आले आहेत. नवीन उद्योग सुरु झाले आणि आज ते नफ्यातही आहेत. कोरोनाचा विषाणू संपुष्टात येईल की नाही, हे आज तरी ठामपणे कोणी सांगू शकत नाही. या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  ‘व्हायरॉलॉजी’ क्षेत्रात भरपूर संधी असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मिती केली जाणार आहे. विद्यापीठातील ‘डीएनए बार कोडिंग सेंटर’मध्ये गेल्या वर्षी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या पुढाकाराने ‘सीएसआर फंडा’तून कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली. या प्रयोगशाळेच्या उद्‌घाटन समारंभावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संकल्प जाहीर केला होता की, विषाणुसंबंधी सखोल अभ्यासक्रम सुरू करून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळनिर्मितीसाठी प्रयत्न केला जाईल. त्यानुसार विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू केला आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, देशातील हे पहिले विद्यापीठ आहे की, ज्याने सामाजिक बांधिलकी जपत दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरू केल्या. कोरोनासारखे नवनवीन विषाणू येत आहेत. त्यांचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. या उद्देशाने विद्यापीठात ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. यात केवळ माणसालाच नव्हे, तर प्राणी, वनस्पतींनाही बाधित करणाऱ्या विषाणुंचाही अभ्यास केला जाणार आहे.        अद्ययावत प्रयोगशाळेत प्रशिक्षणकुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांना पाठविला होता. त्यांच्याकडून ‘ग्रीन’ सिग्नल मिळाल्यानंतर तो प्रस्ताव विद्या परिषदेसमोर ठेवला. पहिली बॅच १५ विद्यार्थ्यांची असेल. विद्यापीठ परिसरात ‘डीएनए बार कोडिंग व कोरोना विषाणू चाचणी’ प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र इमारत उभारली जात आहे. त्यात अद्ययावत ‘व्हायरॉलॉजी लॅब’ उभारली जाणार असून, अभ्यासक्रम तिथेेच शिकविला जाणार आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी, तसेच प्रात्यक्षिक, विश्लेषण, संशोधनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठातील संबंधित तज्ज्ञ प्राध्यापक, तसेच काही बाहेरच्या तज्ज्ञांना पाचरण करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या