इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:57 AM2019-02-21T11:57:33+5:302019-02-21T12:00:53+5:30

हिंदी संयुक्त (लोकवाणी) या विषयाची कृतिपत्रिका ५० गुणांची आहे. या विषयाच्या कृ तिपत्रिकेचे स्वरुप चार भागात विभागले आहे.

Class: 10th, subject: Hindi joint (Lokwani), 2018-19, brochure | इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका

इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका

googlenewsNext
ठळक मुद्देइयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका गद्य व पद्य विभागातील शब्दसंपदा कृतीत समाविष्ट घटक

इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका

हिंदी संयुक्त (लोकवाणी) या विषयाची कृतिपत्रिका ५० गुणांची आहे. या विषयाच्या कृतिपत्रिकेचे स्वरुप चार भागात विभागले आहे.

१) गद्य - १२ अंक

कृ ती- अ) पठित - आकलन कृ ती- २ + शब्दसंपदा- २ + अभिव्यक्ती- २ =६ अंक
आ) पठित - आकलन कृ ती- २ + शब्दसंपदा- २ + अभिव्यक्ती- २ = ६ अंक

२) पद्य - १० अंक

कृ ती- अ) पठित - आकलन कृ ती- २ + शब्दसंपदा- १ + अभिव्यक्ती- २ =५ अंक
आ) पठित - आकलन कृ ती- २ + शब्दसंपदा- १ + अभिव्यक्ती- २ = ५ अंक

३) भाषा अध्ययन (व्याकरण) - १० अंक
१) मानक वर्तनी के अनुसार शुद्ध शब्द छाँटकर लिखना - ०१ अंक
२) अव्यय का वाक्य में प्रयोग - ०१ अंक
३) काल - (पहचानना तथा परिवर्तन) - ०२ अंक
४) मुहावरे - (अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग तथा चयन) - ०२ अंक
५) संधी - (पहचानना, संधी विच्छेद करना, संधी शब्द बनाना) - ०२ अंक
६) वाक्य भेद - (अर्थ एवं रचना के अनुसार पहचानना) - ०२ अंक

४) उपयोजित लेखन - १८ अंक

कृ ती - अ) १) पत्रलेखन (औपचारिक/ अनौपचारिक) - ०४ अंक
२) कहानी लेखन - (लगभग ६० से ७० शब्दों में) - ०४ अंक
(मुद्दे/ सुवचन/ शब्दों के आधार पर, तीनों में से कोई एक ही प्रकार)
कृ ती - आ) १) विज्ञापन लेखन (५० से ६० शब्दों में) - ०४ अंक
२) निबंध लेखन (७० से ८० शब्दों में, दो में से एक विषय पर) - ०६ अंक

गद्य व पद्य विभागातील शब्दसंपदा कृतीत समाविष्ट घटक -

(अनेकार्थी शब्द, शब्द - युग्म, समानार्थी/ पर्यायवाची शब्द, विलोम शब्द, उपसर्ग, प्रत्यय, अनेक शब्दों के लिए एक शब्द, कठिन शब्दों के अर्थ, लिंग, वचन, विरामचिह्न, कृं दत, तद्धित, तत्सम, तद्भव तथा विदेशी शब्द आदि पुछे जाते हैं)


शब्दसंपदा कृ तीसाठी विद्यार्थ्यांनी वरील घटकांचा सराव करणे आवश्यक आहे. आकलन व अभिव्यक्ती या कृती सोडविण्यासाठी पाठ्यपुस्तकातील गद्य व पद्य यांचे सखोल वाचन करावे.

स्वमत् अभिव्यक्ती ही कृती दैनंदिन व्यवहारातील समस्या, पर्यावरण, प्रदूषण तसेच गद्य / पद्यांशातील आशयाला अनुसरुन विचारली जाते. विद्यार्थ्यांनी विषयाचे आकलन करुन आपले विचार मांडायचे आहेत. ही कृती विद्यार्थ्यांनी आवर्जून सोडवावी. मात्र विषयाशी निगडीत मजकूर असावा.

व्याकरण व उपयोजीत लेखन हे विभाग पूर्वीप्रमाणेच आहेत. परंतु पत्रलेखनात बदल करण्यात आला आहे.

पत्रलेखनाचे बदललेले स्वरुप -

औपचारिक पत्राचे स्वरुप
दिनांक : ................
प्रति,
...............
...............
विषय : ...........................................................
संदर्भ : ............................................................
महोदय,
विषय विवेचन : ..................................................
...........................................................................
...........................................................................
भवदीय/ भवदीया,
नाम : ................
पता : ................
.......................
ई-मेल आईडी : ....................................
विद्यार्थ्यांनी पत्रात आपले नाव लिहू नये आणि आपला ई-मेल आईडी लिहू नये. पत्राच्या विषयात कृतिपत्रिकेत जे नाव दिले असेल तेच नाव लिहावे अन्यथा अ.ब.क. असे लिहावे.
परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता आत्मविश्वासाने सामोरे जावे.
 

  • वाल्मिक सेल्या वळवी

(सहाय्यक शिक्षक)
फाटक हायस्कूल, रत्नागिरी

Web Title: Class: 10th, subject: Hindi joint (Lokwani), 2018-19, brochure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.