दहावी उत्तीर्ण असलेल्यांना उच्च न्यायालयात नोकरीची संधी; १ लाख ७३ हजार रुपयांपर्यंत पगार
By देवेश फडके | Updated: January 12, 2021 17:36 IST2021-01-12T17:33:58+5:302021-01-12T17:36:27+5:30
सरकारी नोकरी भरती प्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी उत्तम संधी आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी १५३ पदे, सिस्टिम अॅनालिस्टसाठी ३ पदे, सिस्टिम मॅनेजरसाठी २ पदे आणि सिनियर प्रोग्रामरचे एक पद भरले जाणार आहे.

दहावी उत्तीर्ण असलेल्यांना उच्च न्यायालयात नोकरीची संधी; १ लाख ७३ हजार रुपयांपर्यंत पगार
नवी दिल्ली : सरकारी नोकरी भरती प्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी उत्तम संधी आहे. कोलकाता उच्च न्यायालयात १५९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार calcuttahighcourt.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
कोलकाता उच्च न्यायालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी मान्यता प्राप्त बोर्डाची इयत्ता १० पास असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. याशिवाय मान्यता प्राप्त संस्थेतून एक वर्ष कम्प्युटर डिप्लोमा कोर्स केल्याचे प्रमाणपत्रही आवश्यक आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या अन्य पदांसाठी इंजिनिअरिंग, टेक्नोलॉजी, इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी यात पदवी किंवा कम्प्युटर एप्लिकेशनची पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी १८ ते ४० ची वयोमर्यादा आहे. तर सिनियर अॅनालिस्ट पदासाठी २६ ते ४० ची वयोमर्यादा आहे. तसेच सिनियर प्रोग्रामर आणि सिस्टिम मॅनजेर पदासाठी ३१ ते ४५ ची वयोमर्यादा आहे. कोलकाता उच्च न्यायालयात डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी १५३ पदे, सिस्टिम अॅनालिस्टसाठी ३ पदे, सिस्टिम मॅनेजरसाठी २ पदे आणि सिनियर प्रोग्रामरचे एक पद भरले जाणार आहे.
डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी २२ हजार ७०० ते ५८ हजार ५०० रुपये प्रति महिना, सिनियर अॅनालिस्ट पदासाठी ५६ हजार १०० ते १ लाख ४४ हजार ३०० रुपये प्रति महिना, सिस्टिम मॅनजेर आणि सिनियर प्रोग्रामर पदासाठी ६७ हजार ३०० ते १ लाख ७३ हजार २०० रुपये प्रति महिना पगार आहे. या सर्व पदांसाठी ११ जानेवारी २०२१ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, २७ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.