Be the photographer | छायाचित्रकार व्हा
छायाचित्रकार व्हा

अलीकडे प्रत्येकाच्या हातात नव्हे, खिशात कॅमेरा असतो. इतरांचे फोटो काढण्यापेक्षा स्वत:चेच फोटो काढण्याकडे कल प्रचंड वाढला आहे, पण त्याला व्यवस्थित चालना दिली, तर छायाचित्रण हे करिअरचे एक उत्तम माध्यम आणि साधन होऊ शकेल. छंदाला व्यवसायाची जोड मिळू शकते. आपल्यातील सर्जनता, कल्पकता, कलात्मकता, निरीक्षण शक्ती व प्रसंगावधान दाखविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. ज्याला प्रकाश आणि संधीप्रकाश, निर्मितीक्षम दृष्टीकोन, शिस्तबद्ध विचारशक्ती, निसर्ग आणि प्राणी-पक्ष्यांचे वेड आहे, तो छायाचित्रकार होऊ शकतो. या क्षेत्रात व्यावसायिक आणि हौशी असे दोन प्रमुख प्रकार गणले जातात. केवळ व्यवसायिक छायाचित्रकारच चांगले अर्थाजन करू शकतात असे नाही, तर हौशी छायाचित्रकारही चांगले कमावू शकतात. मात्र, व्यावसायिक छायाचित्रकाराला पूर्ण वेळ याच क्षेत्राला द्यावा लागतो. व्यवसायिक छायाचित्रणाबरोबरच पोर्टेचर, फोटो जर्नलिझम, अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफी, जंगल फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी, मेडिकल फोटोग्राफी अशा शाखांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)

फॅशन फोटोग्राफी
अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफीप्रमाणेच अजून एक महत्त्वाचे क्षेत्र आहे, ते म्हणजे फॅशन फोटोग्राफी. या क्षेत्राला ग्लॅमर आहे, पण या प्रकारचे छायाचित्रण करणाऱ्यााकडे सौंदर्यदृष्टी असावी लागते. उदा. दागिन्यांचे छायाचित्रण. यात दागिन्यावरील बारीक कलाकुसर कॅमेºयात पकडता आली पाहिजे. कपड्यांचे सौंदर्य आणि सौंदर्यवतीची नाजूकता यांचेही तारतम्य बाळगता यावे लागते.

अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफी
अलीकडे प्रत्येक उद्योजकाला जाहिरातीसाठी पर्याय नाही. वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरचित्रवाणी अशा प्रसार माध्यमांत अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफीचे महत्त्व वाढत चालले आहे. अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफीचा थेट संबंध हा त्या उत्पादनाच्या थेट ग्राहकाशी येत असतो. त्यामुळे ग्राहक त्या उत्पादनाकडे कसा आकर्षित होईल, हे छायाचित्रकाराला पाहावे लागते. त्यासाठी चिकाटी, अंतर्गत सजावटीचे भान, सौंदर्यदृष्टी आणि उत्तम निर्मितीक्षमता हे गुण असावे लागतात.

इंडस्ट्रिअल फोटोग्राफी
अलीकडे उद्योगधंद्यात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. जागतिकीकरणाचा प्रभाव याला कारणीभूत आहे. आपल्याला त्या स्पर्धेत टिकायचे असेल, तर नवनवीन आव्हाने स्वीकारावी लागतात. मालविक्रीची नवनवीन तंत्र आत्मसात करावी लागतात. आपल्या मालाला योग्य उठाव मिळावा, बाजारात त्याची चर्चा व्हावी, असे प्रत्येक उद्योजकाला वाटत असते. अशा वेळी इंडस्ट्रिअल फोटोग्राफी मदतीला येते. त्यासाठी छायाचित्रकाराकडे अतिसूक्ष्म दृष्टी असावी लागते. त्याला शास्त्रीय दृष्टी असावी लागते. कारण औद्योगित छायाचित्रकाराला उत्पादनाचा तपशील कॅमेºयात बंद करावा लागतो. उद्योगउदिमांना वाहिलेल्या नियतकालिकांना अशा प्रकारच्या छायाचित्रकारांची गरज असते.

वाइल्ड लाइफ फोटोग्राफी
निसर्ग आणि जंगल यांची आवड जवळपास प्रत्येकालाच असते. पर्यटनाला जाताना इतर आवश्यक वस्तूंमध्ये कॅमेरा हा असतोच. त्याचे स्थान पक्के असते. तथापि, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी हे एक वेगळे क्षेत्र आहे. छायाचित्रकाराला केवळ छायाचित्रणाचे ज्ञान असणेच आवश्यक नाही, तर प्रचंड चिकाटी आणि आवड असणेही तेवढेच आवश्यक आहे. याशिवाय प्राणीजगताची त्याला ओळख असली पाहिजे. निसर्ग नियम माहीत असला पाहिजे. जोखीम स्वीकारण्याची क्षमताही त्याच्याकडे असावी लागते. अलीकडे वाइल्ड लाइफ फोटोग्राफी हा एक मोठा व्यवसाय झाला आहे.

जर्नलिझम फोटोग्राफी : करिअरचे हेही एक माध्यम आहे, पण हे क्षेत्र धावपळीचे आहे. छायाचित्रकाराला अचूक क्षण पकडता आला पाहिजे. त्यासाठी मेहनत व प्रसंगावधान या दोन गुणांची देण त्याच्याकडे असावी लागते. छायाचित्रणाचा अभ्यासक्रम तीन महिने ते दोन वर्षे कालावधीचा असतो. मास एज्युकेशन आणि बॅचलर आॅफ फाइन आटर््समध्ये छायाचित्रण हा विषय अनिवार्य असतो. काही कोर्सेससाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची गरज नसते. अनुभव व वय या दोन घटकांबरोबरच छायाचित्रणाची जाण त्याला असावी लागते.

Web Title: Be the photographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.