तुमच्या सीव्हीत या 3 चुका आहेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 17:06 IST2017-08-03T17:04:20+5:302017-08-03T17:06:03+5:30
सीव्ही लिहिणं तसंही अवघड, पण या टिपीकल चुका करत असाल तर लोक तुमचा सीव्ही कचरापेटीतच टाकतील!

तुमच्या सीव्हीत या 3 चुका आहेत का?
सीव्ही तर काय हल्ली सगळीकडेच द्यावा लागतो. आपण देतोही. पुन्हा पुन्हा सीव्ही अपडेट करतो. पण ते करताना आपल्या सीव्हीत काही चुका होताहेत का, हे तपासून पहायला हवं. बहुसंख्य लोक सीव्ही लिहिताना 3 चुका हमखास करतात. आणि मग नोकरी मिळत नाही म्हणून पस्तावतात. तुमचा सीव्ही पहा. त्यात या 3 चुका आहेत का?
कारण त्या असतील तर तुमचा सीव्ही हा इतरांसारखाच दिसतो. कॉपी पेस्ट. त्यात तुमचं यश, वेगळेपण, कामाचा उरक, तुमचं कौशल्य हे सारं लपून जातं. आणि उरतो फक्त एक कागद. असं करू नये. आपला सीव्ही हे आपल्या व्यक्तिमत्वाचं एक रुप, आपली ओळख वाटली पाहिजे. सीव्ही मोठा नाही, तर अर्थपूर्ण, आकर्षक आणि नेमका असावा.
सीव्ही लिहिता येणं हे एक स्किल आहे, पण निदान काही चुका तरी आपण हमखास टाळू शकतो.
1) ऑबजेक्टिव्ह
बहुसंख्य लोक आपल्या सीव्हीमध्ये सुरुवातीलाच हे ऑबजेक्टिव्ह प्रकरण लिहितात. कशाला? म्हणजे आय अॅम लूकिंग फॉर अ जॉब विज गिव्हज चॅलेंजेस .वगैरे भरताड कशाला लिहिता? त्याचा काहीही उपयोग नाही. हे कॉपी पेस्ट आहे हे सगळ्यांना कळतं. त्यापेक्षा दोन ओळीत असं काहीतरी लिहा, जे वाचून हा उमेदवार वेगळा आहे हे वाचणार्याला कळेल!
2. पॅरा कशाला?
लांब लचक वाक्य. आठ आठ पॅराग्राफ करतात अनेकजण. त्याचा काय उपयोग. निबंध लिहू नका. थोडक्यात, पॉईण्टर्समध्ये, कमीत कमी शब्दात स्वतर्विषयी काय ते सांगा.
3. अचिव्हमेण्ट वेगळया, जबाबदार्या वेगळ्या.
तुम्ही करत असलेलं काम हे काही तुमचं कर्तृत्व नाही. ती तुमची जबाबदारी. याहून वेगळे पुरस्कार, काही विशेष प्रोत्साहन, कौतूक असं काही असेल तर ते लिहा. टार्गेट पूर्ण केलं, हे काही कर्तृत्व नव्हे, ती तर जबादारीच. त्यामुळे आपण काम काय करतो, हे वेगळं लिहा. आपलं कर्तृत्व म्हणजेच अचिव्हमेण्ट वेगळ्या लिहा.