शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
5
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
6
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
7
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
8
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
9
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
10
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
11
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
12
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
13
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
14
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
15
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
16
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
17
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
18
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
19
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
20
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा

२२ लाख आयटी प्रोफेशनल नोकऱ्या सोडणार; भारतात इंडस्ट्रीला घरघर, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 16:51 IST

आयटी सेक्टरला भारतीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. एका रिपोर्टनुसार IT-BPM क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

आयटी क्षेत्रामुळे गेल्या दोन दशकांत भारताला सोन्याचे दिवस आले आहेत. आयटी सेक्टर वाढल्याने करोडो लोकांना रोजगार मिळाला आहे. घरांची मागणी, वाहनांची मागणी, जीवनावश्यक वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, याच आयटी सेक्टरला आता घरघर लागण्याची चिन्हे आहेत. आयटी प्रोफेशनल्सची संख्या घटू लागल्याने बड्या बड्या आयटी कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत. 

आयटी सेक्टरला भारतीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. एका रिपोर्टनुसार IT-BPM क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हा वेग कमालीचा वाढू लागला आहे. असेच सुरु राहिले तर २०२५ पर्यंत २२ लाख आयटी प्रोफेशनल नोकरी सोडण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेला एट्रिशन रेट म्हटले जात आहे. स्वेच्छेने नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दराची मोजमाप करण्यासाठी ही व्याख्या वापरली जाते. 

या रिपोर्टनुसार ५७ टक्के आयटी प्रोफेशनल पुन्हा कधीही आयटी सेक्टरमध्ये परतणार नाहीएत. पगार वाढल्याने चांगली कामगिरी करता येईल आणि समाधान मिळेल, असे या कर्मचाऱ्यांना वाटत आहे. टीम लीज डिजिटलचे सीईओ सुनील चेम्मनकोटील यांच्यानुसार भारतीय आयटी क्षेत्राने गेल्या दशकात चांगली वाढ पाहिली आहे. IT क्षेत्राने 15.5 टक्के वाढ नोंदवली असून, आर्थिक वर्ष 2022 मध्ये 5.5 लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. सध्याच्या काळात कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम दोन्ही बदलले आहेत.हे कर्मचारी आपल्या कामाचे स्वरुप आणि त्यांच्या करिअरचा आढावा घेत आहेत. यावर काही फरक दिसताच हे कर्मचारी आपली नोकरी अर्ध्यातच सोडून अन्य कामांकडे वळू लागले आहेत, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

कर्मचाऱ्यांचे काय म्हणणे आहे...50 टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आयटी क्षेत्रातील कर्मचारी चांगले उत्पन्न आणि फायदे नसल्यामुळे नोकऱ्या सोडत आहेत. तर 25 टक्के लोकांचे म्हणणे आहे की करिअरमध्ये वाढ न होणे हे नोकऱ्या सोडण्याचे मुख्य कारण आहे. 2021 मध्ये नवीन-युगातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली आहे, यामुळे देखील नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.  

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी