जि.प. हायस्कूलमध्ये शिजतो निकृष्ट पोषण आहार!

By Admin | Updated: December 4, 2015 02:41 IST2015-12-04T02:41:34+5:302015-12-04T02:41:34+5:30

सरपंच-उपसरपंचाकडून पोषण आहाराची तपासणी; संतप्त पदाधिका-यांनी केली कारवाईची मागणी.

Zip High School Diet Bad Foods! | जि.प. हायस्कूलमध्ये शिजतो निकृष्ट पोषण आहार!

जि.प. हायस्कूलमध्ये शिजतो निकृष्ट पोषण आहार!

धाड: येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांंना निकृष्ट दर्जाचे मध्यान्ह भोजन देण्यात येत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी येथील सरपंच रिझवान सौदागर यांना केल्या होत्या. या तक्रारीवरून ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पालक यांच्यासह सरपंच-उपसरपंचांनी येथील उर्दू व मराठी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांंना निकृष्ट जेवण दिल्या जात असल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असून, नेहमीच अशा प्रकारचे भोजन मुलांना वितरित होते. या शाळेत उर्दू व मराठीचे सुमारे १६८ विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांंना देण्यात येणारे अत्यंत निकृष्ट व अपुरे भोजन दिल्या जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. सरपंच रिजवान सौदागर आणि ग्रा.पं. सदस्यांनी याबाबत रोष व्यक्त करून शाळेच्या मुख्याध्यापकांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. वास्तविक प्रती विद्यार्थी कमीत कमी १६0 ग्रॅमप्रमाणे भोजन देणे अभिप्रेत असताना या शाळेवर थातूर-मातूर पद्धतीत भोजनाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांंना ते वाटप करण्यात येते. परिणामी असे भोजन बहुतेक विद्यार्थी घेत नाहीत. तसेच भोजनाची पाहणी केल्यानंतर शिजवण्यात आलेल्या भोजनात वापरण्यात येणार्‍या साहित्याची वाणवा आढळली असून, हा प्रकार धक्कादायक असून, संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाईची मागणीही यावेळी पदाधिकर्‍यांनी केली आहे.

Web Title: Zip High School Diet Bad Foods!