शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळांना झळाळी!

By admin | Updated: April 2, 2017 16:43 IST

मोताळा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकत असून, एकापेक्षा एक गुणवत्तेचे पाऊल पुढे टाकत आहे.

मोताळा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकत असून, एकापेक्षा एक गुणवत्तेचे पाऊल पुढे टाकत आहे. यासाठी शिक्षकांसह लोकसहभागाचा वाटा महत्वाचा दुवा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालनामिळावी यासाठी प्रयत्न करीत असलेल्या खेडी (पान्हेरा) व टाकळी (वाघजाळ) येथील जिल्हा परिषद शाळांना लोकसहभागातून झळाळी मिळत आहे.तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्ञानरचनावाद व डिजिटल शाळेचे वारे वाहत असून, खेडी व टाकळी वाघजाळ येथील जिल्हा परिषद शाळांची आयएसओकडे  घौडदौड सुरू आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे. अनेक शिक्षक पदरमोड करीत अतिरिक्त वेळ देऊन शाळेला डिजिटल बनविण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीसह लोकसहभागाचा वाटा मिळविण्यासाठी परिश्रम घेत आहे. खेडी येथील शाळेला आयएसओचा दर्जा मिळाविण्यासाठी शिक्षकांनी कंबर कसली असून, आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी शिक्षकांनी लोकसहभागातून आर्थिक रक्कम जमा करण्यासाठी भगीरथ प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांसह दानदात्यांच्या प्रत्यक्ष भेटी, चर्चा सत्र व जनजागृती करून जास्तीत जास्त लोकसहभागाची रक्कम कशी मिळेल यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी अशोक लांजुळकर या शिक्षकांचा वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांची पत्नी कल्पना लांजुळकर कार्यरत असलेल्या खेडी येथील शाळेला या उदात्त हेतून वाढदिवसाचा खर्च टाळून १० हजार रूपयांची रोख मदत दिली. बुधवारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानाभाऊ  मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  कार्यक्रमात अशोक लांजुळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी १० हजाराची रोख रक्कम मुख्याध्यापक कल्पना अशोक लांजुळकर यांना सुपुर्द करण्यात आली. या प्रसंगी शिक्षक परेश पडोळकर, शिक्षिका अनिता वैराळकरसह उमेश लाजगे, खुुरसिंग मोरे, भरत मोरे, सुरेश डुकरे व गावकरी उपस्थित होते.

टाकळी शाळेस सैनिकाने दिली ५ हजाराची मदतप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत टाकळी (वाघजाळ) येथील मराठी प्राथमिक शाळेने गरूड झेप घेतली असून, भौतिक सुविद्यांबरोबरच गुणात्मक विकासाचा आलेख चढत ठेवल्याने या मराठी प्राथमिक शाळेची आयएसओकडे वाटचाल सुरू झाली आहे. भारतीय सैन्यात सेवेत असलेले परमेश्वर महादेव शिराळ यांनी शाळेला आयएसओ मानांकनाच दर्जा मिळावा यासाठी बुधवारी ५ हजाराची मदत दिली. पुढील आठवड्यात पुन्हा ६ हजाराची मदत करण्याचे त्यांनी मुख्याध्यापक  अशोक राजनकर यांना आश्वासन दिले. सैन्यदलातून नियमित रजेवर आल्यानंतर सदर शाळेला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचा कायापालट झालेला त्यांनी पाहिला. शाळेची गरूड झेप पाहून प्रभावित  झाले. यावेळी मुख्याध्यापक राजनकर यांनी भौतिक सुविद्या व आयएसओ साठी होणाऱ्या खर्चाची जाणीव करून दिली. लगेच त्यांनी ५  हजार रूपयांची मदत मुख्याध्यापकांच्या सुपुर्द केली. या प्रसंगी रूमाल टोपीसह गुलाब पुष्प देऊन सैनिक शिराळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अल्पभूधारक शेतकरी प्रेमकुमार धुरंधर यांनीही २ हजार रूपयांची मदत देऊन समाजाला सम्यक दृष्टिकोण दिला. यावेळी शा.व्य.स. अध्यक्ष अरविंद मारोडकर, सौ. वर्षा अशोक राजनकर, स. अ. कुमारी अनिता सोनोने, स.अ. सोपान शिराळसह ग्रामस्थ उपस्थित होते.