विहिरीत पडून युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 21, 2014 23:59 IST2014-10-21T23:59:45+5:302014-10-21T23:59:45+5:30
पोहता येत नसल्याने युवकाचा मृत्यू; डोणगाव येथील घटना.

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू
डोणगाव (बुलडाणा) : बेलगाव येथे विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारला घडली.
डोणगाव येथील आदिनाथ वानखेडे (१७)येथील युवक पाणी काढण्यासाठी विहीरीजवळ गेला असता पाय घसरून विहीरीत पडला व पोहणे येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळापासून आदिनाथ घरी आला नसल्याने शेजार्यांनी शोधाशोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा शेतात शोध घेतला असता, सुरेश राऊत यांच्या विहिरीजवळ आदीनाथच्या चपला आढळून आल्या. विहिरीत डोकावून पाहिले असता आदिनाथचे प्रेत आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी र्मग दाखल केला आहे.