युवकास काठीने मारहाण

By Admin | Updated: April 15, 2015 00:50 IST2015-04-15T00:50:21+5:302015-04-15T00:50:21+5:30

मेहकर तालुक्यातील शहापूर येथील घटना.

Yuvakas hit the sticks | युवकास काठीने मारहाण

युवकास काठीने मारहाण

डोणगाव (जि. बुलडाणा ) : मेहकर तालुक्यातील शहापूर येथील एका युवकास क्षुल्लक कारणावरून काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना १२ एप्रिल रोजी घडली. शहापूर येथे एका १९ वर्षीय मुलीस गावातील अमोल रुपराव शेजुळ हा त्रास द्यायचा म्हणून प्रमोद लादे याने त्याला त्रास का देतो, अशी विचारणा केली. तेव्हा अमोल शेजुळ याने प्रमोद लादे याला काठीने मारहाण करून जखमी केले. तर कडुबा माणिकराव लादे, सिंधुबाई रुपराव शेजुळ व रुपराव शेजुळ यांनीही प्रमोदला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी युवकास औरंगाबाद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून डोणगाव पोलीस स्टेशनला अमोल रुपराव शेजुळ, कडुबा माणिकराव लादे, सिंधुबाई रुपराव शेजुळ, रुपराव शेजुळ यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Yuvakas hit the sticks