दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 12, 2015 00:05 IST2015-05-12T00:03:28+5:302015-05-12T00:05:54+5:30

मलकापूर मार्गावरील राजूर घाटात अपघात.

Youth's death in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

मोताळा (जि. बुलडाणा) : मलकापूर मार्गावरील राजूर घाटात एका दुचाकीला समोरून भरधाव वेगात येणार्‍या टाटा ४0७ वाहनाने धडक दिली. यात सदर दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज ११ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मासरुळ येथील विलास विठ्ठल वाघ (२८) हा युवक एम.एच. २ डीके ८२५ क्रमांकाच्या दुचाकीने मोताळा येथून बुलडाणाकडे येत होता. दरम्यान, बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या राजूर घाटातील मलकापूर वळण मार्गावर एमएच 0४ वीए ३८0 क्रमांकाच्या भरधाव टाटा ४0७ वाहन या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर दुचाकीसह दुचाकीस्वार विलास वाघ हा गंभीर जखमी अवस्थेत या मार्गावर बर्‍याच काळ पडून होता. नागरिकांनी माहिती पोलिसात दिली. घटनेची माहिती मिळतात बोराखेडी पोलीस घटनास्थाळावर पोहचली; मात्र जखमी युवकाचा मृत्यू झाला होता.

Web Title: Youth's death in a two-wheeler accident