पळशी बु. : येथील १९ वर्षीय युवकाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली. पळशी बु. येथील १९ वर्षीय गणेश समाधान बोराडे व त्याचे मित्र ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान एम.एच.२८-एन६५१ या दुचाकीने पळशी बु. वरून अकोल्याकडे जात होते. बाळापूरनजिक असलेल्या भिंकुड नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने गणेशच्या दुचाकीस जबर धडक दिली. या घटनेत गणेशचा जागीच मृत्यू झाला.
रस्ता अपघातात युवकाचा मृत्यू
By admin | Updated: April 5, 2017 23:43 IST