विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 13, 2017 00:36 IST2017-07-13T00:36:42+5:302017-07-13T00:36:42+5:30
संग्रामपूर : शेतातील मीटरपेटीमध्ये अचानक आलेल्या विद्युत प्रवाहामुळे शेतकरी युवकाचा मृत्यू झाला. ही घटना १२ जुलै रोजी सकाळी धामणगाव शिवारात घडली.

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : शेतातील मीटरपेटीमध्ये अचानक आलेल्या विद्युत प्रवाहामुळे शेतकरी युवकाचा मृत्यू झाला. ही घटना १२ जुलै रोजी सकाळी धामणगाव शिवारात घडली.
धामणगाव येथील दत्तात्रय त्र्यंबक गोतमार (२८) हे युवा शेतकरी शेतातील कपाशीला पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान, मीटरपेटीमध्ये अचानक विद्युत प्रवाह सुरु झाल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. यातच त्याचा मृत्यू झाला. या शेतकऱ्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी असा आप्त परिवार आहे.