रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 01:31 IST2017-03-11T01:31:26+5:302017-03-11T01:31:26+5:30

नागझरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे गाडीतून पडून अनोळखी तरुणाचा मृत्यू.

Youth's death due to fall from the train | रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

शेगाव, दि. १0- नागझरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे गाडीतून पडून एका अनोळखी २0 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १0 वाजताच्या दरम्यान घडली. स्थानकावरील एका खांबाजवळ २0 वर्षीय युवक धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने त्याच्या डोक्यास जबरी मार लागल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्यास जखमी अवस्थेत गँगमन प्रफुल्ल अंभोरे यांनी मालगाडीमध्ये घेऊन शेगाव येथे आणले असता शेगाव रेल्वे स्थानकावर तो मरण पावला.

Web Title: Youth's death due to fall from the train