पाझर तलावात बुडून युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 17, 2014 00:44 IST2014-07-16T23:57:25+5:302014-07-17T00:44:12+5:30

मातोळा तालुक्यातील तालखेड येथील घटना.

Youth's death drowning in the percolation tank | पाझर तलावात बुडून युवकाचा मृत्यू

पाझर तलावात बुडून युवकाचा मृत्यू

मोताळा : पाझर तलावामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज १६ जुलै रोजी सकाळी ११:३0 वाजेच्या सुमारास तालखेड शिवारातील इंडोर्जमन पाझर तलावामध्ये घडली.
तालुक्यातील डिडोळा खु: येथील भास्कर फकीरा शिंबरे वय २0 हा युवक आज सकाळच्या दरम्यान तालखेड शिवारातील पाझर तलावामध्ये आंघोळीसाठी गेला होता. या युवकाने तलावामध्ये उडी घेतली असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला. तालखेड येथील पोलिस पाटील यांनी घटनेची माहिती बोराखेडी पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी भास्करचे प्रेत बाहेर काढले. याप्रकरणी पोलिस पाटील शिवदास मारोती दोडे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी र्मग दाखल केला असून, पुढील तपास सुपडसिंग चव्हाण करीत आहेत.

Web Title: Youth's death drowning in the percolation tank