मल्टीप्लेयरच्या स्फोटात युवक जखमी
By Admin | Updated: October 4, 2016 03:08 IST2016-10-04T03:08:04+5:302016-10-04T03:08:04+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील घटना; बेवारस स्थितीत आढळले होते उपकरण.

मल्टीप्लेयरच्या स्फोटात युवक जखमी
मोताळा (जि. बुलडाणा),दि. ३- बेवारस पडलेल्या कॅरीबॅगमधील मल्टीप्लेयर सुरू करताच भयंकर स्फोट झाल्याने तालुक्यातील अंत्री येथील २७ वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला. ही घटना ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजतादरम्यान घडली.
अंत्री येथील विजय नारायण बहादरे यांना त्यांच्या दुकानाजवळ गत काही दिवसांपासून बेवारस स्थितीत मुल्यवान उपकरण पडलेले आढळले. विजय बहादरे यांनी उत्सुकतेपोटी कॅरीबॅग उघडून पाहली असता त्यामध्ये मल्टीप्लेयर, टिस्को टेप, कटर, वायर टेप व काही कागद आढळून आले. विजय बहादरे यांनी यातील मल्टीप्लेयर दुकानात नेऊन वाजविण्याचा प्रयत्न केला असता, मल्टीप्लेयरचा भयंकर स्फोट होऊन त्यात तो गंभीर जखमी झाला. या स्फोटात विजय बहादरे यांच्या हात, पाय, कान व पोटाला गंभीर जखमा झाल्या आहेत.