गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: July 7, 2016 02:38 IST2016-07-07T02:38:56+5:302016-07-07T02:38:56+5:30
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
मेहकर (जि. बुलडाणा) : स्थानिक जानेफळ वेस परिसरातील एका २५ वर्षीय युवकाने स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५ जुलै रोजी घडली. स्थानिक जानेफळ वेस परिसरातील रहिवासी मो.तौफीक मो.रफिक (२५) याने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना ५ जुलै रोजी संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, वृत्त लिहिस्तोवर आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दरम्यान पोलीस पुढील तपास करीत आहेत.