शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

मलकापुरातील युवकाचा नळगंगा धरणात बुडून मृत्यू, नागपूर उच्च न्यायालयात करत होता प्रॅक्टिस

By सदानंद सिरसाट | Updated: March 26, 2024 16:41 IST

लि. भो. चांडक विद्यालयाच्या मागे वसलेल्या परिसरातील रहिवासी अलोकसिंह दिनेशसिंह ठाकूर (२४) हा एलएलबी पदवी घेतल्यानंतर गतकाळात नागपूर उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होता. तिथेच करिअर करायचे, असे त्याने स्थानिक सहकाऱ्यांना सांगितले होते.

मलकापूर (बुलढाणा) : येथील युवा विधिज्ञ तथा नागपूर उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या २४ वर्षीय युवकाचा नळगंगा धरणात बुडून मृत्यू झाला. सोमवारी धुळवडीच्या दिवशी बुडालेल्या युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला आहे.लि. भो. चांडक विद्यालयाच्या मागे वसलेल्या परिसरातील रहिवासी अलोकसिंह दिनेशसिंह ठाकूर (२४) हा एलएलबी पदवी घेतल्यानंतर गतकाळात नागपूर उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होता. तिथेच करिअर करायचे, असे त्याने स्थानिक सहकाऱ्यांना सांगितले होते.धुळवडीच्या दिवशी सोमवारी दुपारी अलोकसिंह हा त्याच्या मित्रांसोबत नळगंगा धरणावर गेला, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याने पाण्यात उडी घेतली. त्यानंतर तो पाण्याबरोबर आलाच नाही. तो बुडाल्याचे लक्षात येताच सहकारी मित्रांनी आरडाओरडा केला. त्यातच गोताखोरांना पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही.मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. सकाळी ८ वाजताच्या सुमारास अलोकसिंहचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी मृतदेह तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. या घटनेची माहिती कळताच असंख्य लोकांनी रुग्णालयात गर्दी केली. नळगंगा धरणाचा जलसाठा घटलेल्या आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी असतानाही अलोकसिंह याचा मृत्यू झाला. त्याठिकाणी पाणी पातळी आठ ते दहा फूट इतकी आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू पाण्यात बुडाल्यावर झटके आल्याने झाला असावा, असा अंदाज आहे. तर अलोकसिंहच्या अकाली मृत्यूने त्याच्या सहकाऱ्यांना हादरा बसला आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेbuldhanaबुलडाणाMalkapurमलकापूर