गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By Admin | Updated: May 24, 2017 01:05 IST2017-05-24T01:05:12+5:302017-05-24T01:05:12+5:30

मलकापूर : गृहकर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून एक २४ वर्षीय अविवाहित तरुण शेतकऱ्याने दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

Youth Farmer's Suicide Suicide | गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या

गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : गृहकर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून एक २४ वर्षीय अविवाहित तरुण शेतकऱ्याने दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना मौजे बेलाड येथील शेतशिवारात २१ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
बेलाड येथील प्रशांत प्रल्हाद संबारे वय २४ या तरुणाकडे सहा एकर शेती असून, आईसह असलेल्या या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. प्रशांतला दोन बहिणी असून, त्यांचे लग्न झालेले आहे, तर वडिलांचा १० ते १२ वर्षांपूर्वीच मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीतही मोठ्या हिमतीने प्रशांतने शेतीची कास धरली. दरम्यान, महिंद्रा फायनान्स कंपनीकडून दीड लाखाचे कर्ज घेत घर बांधले, तर गत वर्षभरात सततची नापिकी झाल्याने प्रशांतची आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यातच घेतलेले गृहकर्ज कसे फेडावे, या चिंतेने तो त्रस्त झाला होता.

Web Title: Youth Farmer's Suicide Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.