नैराश्यातून युवकाची गळफास लावून आत्महत्या

By विवेक चांदुरकर | Updated: November 15, 2023 16:05 IST2023-11-15T16:03:45+5:302023-11-15T16:05:09+5:30

नांदुरा : लग्न होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून शहरातील नांदुरा खुर्द भागातील ज्ञानेश्वर रमेश गुजर (वय ३४ वर्षे) यांनी राहत्या ...

Youth ends life due to depression | नैराश्यातून युवकाची गळफास लावून आत्महत्या

नैराश्यातून युवकाची गळफास लावून आत्महत्या

नांदुरा : लग्न होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून शहरातील नांदुरा खुर्द भागातील ज्ञानेश्वर रमेश गुजर (वय ३४ वर्षे) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.

याबाबत मृतकाचा मोठा भाऊ दत्तात्रय रमेश गुजर यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांचा लहान भाऊ ज्ञानेश्वर रमेश गुजर मागील चार ते पाच वर्षांपासून लग्न होत नसल्याने निराश राहत होता. त्यातून त्याला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून मृतक ज्ञानेश्वर रमेश गुजर (वय ३४ वर्ष) याने राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Youth ends life due to depression