रंगकाम करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 14:06 IST2019-11-10T14:05:55+5:302019-11-10T14:06:01+5:30
रंगकाम करत असताना गच्चीवरून गेलेल्या वीजेच्या मुख्य वाहीनीच्या तारेला कामादरम्यान त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला.

रंगकाम करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : येथील एका २८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. गाव परिसरात रंगकाम करण्याचा त्याचा व्यवसाय होता.
राहूल दगडू शेलार असे मृत युवकाचे नाव आहे. नऊ नोव्हेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील मासरूळ येथे भास्करराव भीमराव देशमुख यांच्या घराचे रंगकाम करण्यासाठी ते गेले होते. हे रंगकाम करत असताना गच्चीवरून गेलेल्या वीजेच्या मुख्य वाहीनीच्या तारेला कामादरम्यान त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने तेथून धाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित या घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतक राहूल शेलार याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, वडील व भाऊ असा परिवार असून त्यांना अर्थिक मदत देण्याची मागणी आहे.