धक्कादायक! विद्युत धक्का लागून तरूणाचा मृत्यू

By विवेक चांदुरकर | Updated: December 13, 2023 17:35 IST2023-12-13T17:34:07+5:302023-12-13T17:35:00+5:30

इलेक्ट्रीक फिटींचे काम करीत असताना विजेचा शाॅक लागून घटनासथळावर मृत्यू झाला.   

Youth dies due to electric shock in buldhana | धक्कादायक! विद्युत धक्का लागून तरूणाचा मृत्यू

धक्कादायक! विद्युत धक्का लागून तरूणाचा मृत्यू

विवेक चांदूरकर, उमापूर (जि. बुलढाणा) : जळगाव जामोद तालुक्यातील रसुलपूर गावाचे पोलीस पाटील सादीक देशमुख यांचा २० वर्षीय मुलगा समीर याचा १२ डिसेंबर रोजी सायंकाळी इलेक्ट्रीक फिटींचे काम करीत असताना विजेचा शाॅक लागून घटनासथळावर मृत्यू झाला.   

समीर देशमुख (वय २० वर्षे) लोकांच्या घरांचे तसेच दुकानांच्या इलेक्ट्रीक फिटींचे काम करीत होता. तो जळगाव जामोद येथे एका घरामध्ये इलेक्ट्रीफ फिटींगचे काम करीत होता. काम करीत असताना त्याला वीजेचा जोरदार धक्का लागला. यामध्ये घटनास`थळावरच त्याचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला त्याला रूग्णालयात नेते असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. मनमिळावू स्वभावामुळे तो रसूलपूर शिवारात सर्वत्र परिचीत होता. त्याच्या मृत्यूमुळे रसूलपूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   

Web Title: Youth dies due to electric shock in buldhana