विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: December 4, 2014 00:43 IST2014-12-04T00:43:39+5:302014-12-04T00:43:39+5:30

३५ वर्षीय शेतकरी तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद.

The youth dies by drowning in the well | विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

नांदुरा (बुलडाणा): तालुक्यातील पोटळी येथील एका ३५ वर्षीय शेतकरी तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सदर तरुणाने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा होत आहे. याबाबत परशराम दशरथ तांगळे (रा. पोटळी) यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, १ डिसेंबरच्या दुपारी भागवत गोविंदा तांगळे (वय ३५ रा. पोटळी) हा घरून निघून गेला होता. रात्री घरी न आल्यामुळे त्याचा शोध घेतला असता, शिवाजी अंबादास तांगळे यांच्या शेतातील विहिरीत भागवतचा मृतदेह आढळला. यावरून पोलिसांनी र्मग नोंदविला असून नांदुरा पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: The youth dies by drowning in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.