विष प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: April 27, 2015 01:32 IST2015-04-27T01:32:10+5:302015-04-27T01:32:10+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळा येथील घटना.

Youth death due to poisoning | विष प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

विष प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

बुलडाणा : नजीकच्या डोंगरखंडाळा येथील एका युवकाचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली. बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील राहुल ग्यानसिंह जाधव (२५) याने २५ एप्रिल रोजी रात्री विष प्राशन केले होते. त्याबद्दल माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. बुलडाणा ग्रामीण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Youth death due to poisoning