युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: November 23, 2015 01:18 IST2015-11-23T01:18:53+5:302015-11-23T01:18:53+5:30

विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मजूर युवकाचा मृत्यू.

Youth death | युवकाचा मृत्यू

युवकाचा मृत्यू

बुलडाणा : इमारत बांधकामावर असलेल्या एका मजूर युवकाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास शहरातील चिखली मार्गावरील वृंदावन नगर येथे घडली. बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथील शे. सुलतान शे. वहाब (३0) हा बांधकामाच्या सेंट्रिंगचा व्यवसाय करीत होता. आज सकाळी तो शहरातील वृंदावननगर येथे कामाच्या ठिकाणी पोहोचला. काम करीत असताना अचानक विजेच्या तारेला स्पर्श होऊन त्याला जोरदार धक्का लागला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच देऊळघाटचे सरपंच आरिफ खान, उपसरपंच मोहन सपकाळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जुनैद खाँ, ग्रामपंचायत सदस्य गजन्फरउल्लाह खान, हमीद खान यांच्यासह ग्रामस्थ तेथे पोहोचले. इमारतीचे मालक गजानन शिवराम भिवसनकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली.

Web Title: Youth death