बुलढाण्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By संदीप वानखेडे | Updated: August 7, 2023 17:31 IST2023-08-07T17:31:24+5:302023-08-07T17:31:37+5:30
मुकेश मगर या यवुकाने साखरखेर्डा शिवारातील नितीन महाजन यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सुधीर राजपूत यांना दिसले.

बुलढाण्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
साखरखेर्डा : येथील सुशिक्षित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ ऑगस्ट राेजी उघडकीस आली. मुकेश विलास मगर (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे.
मुकेश मगर या यवुकाने साखरखेर्डा शिवारातील नितीन महाजन यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सुधीर राजपूत यांना दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती मुकेशच्या कुटुंबीयांना दिली. मुकेश हा सुशिक्षित असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते. गावालगतच नितीन सावजी यांचे शेत असल्याने घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.
मृतकाचे वडील विलास सखाराम मगर यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार बाजीराव खरात, लक्ष्मण इनामे यांनी पंचनामा केला असून, मृतदेह विच्छेदन करण्यासाठी सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास साखरखेर्डा ठाणेदार व सहकारी करीत आहेत.