गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By संदीप वानखेडे | Updated: January 28, 2024 16:54 IST2024-01-28T16:54:25+5:302024-01-28T16:54:39+5:30
अंढेरा : येथूनच जवळच असलेल्या सावखेड नागरे येथील ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २८ जानेवारी ...

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
अंढेरा : येथूनच जवळच असलेल्या सावखेड नागरे येथील ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २८ जानेवारी राेजी उघडकीस आली. कन्हैया मुरलीधर मैंद असे मृतक युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अंढेरा पाेलिसांनी अकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे.
अंढेरा पोलिस अंतर्गत येणाऱ्या व देऊळगावराजा तालुक्यातील सावखेड नागरे येथे सासुरवाडीत मुलाबाळांसह चार ते पाच वर्षांपासून राहण्यास आलेल्या कन्हैया मुरलीधर मैंद या युवकाने राहत्या घरात गळफास घेतला़. ही घटना २८ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी मृतकाच्या भाऊ रामेश्वर मुरलीधर मैंद रा. मलकापूर पांग्रा यांनी अंढेरा पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
घटनेचा तपास ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक गजानन वाघ हे करीत आहेत. सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी देऊळगावही ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्या व त्यानंतर मृतकावर जालना जिल्ह्यातील देवमूर्ती या मूळगावी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर मृतक कन्हैया यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, वडील, तीन भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे.