चाकू हल्ल्यात युवक जखमी
By Admin | Updated: March 12, 2017 02:05 IST2017-03-12T02:05:26+5:302017-03-12T02:05:26+5:30
ढालसावंगी येथील घटना.

चाकू हल्ल्यात युवक जखमी
ढालसावंगी(जि. बुलडाणा), दि. ११- येथील गावातील युवकाने गावातीलच एका युवकावर चाकू मारुन जखमी केल्याची घटना १0 मार्च रोजी सायंकाळी ७:३0 वाजताच्या दरम्यान घडली.
ढालसावंगी येथील वार्ड नं.२ मधील रहिवाशी पंढरी मधुकर मान्टे वय २0 याने याच्याच घराजवळ वार्ड नं १ मधील रहिवाशी अंकुश सुधाकर जाधव वय २0 याला डाव्या बाजूला बरगाडीत चाकू मारुन जखमी केले.
अंकुशच्या आई-वडिलांनी धाड पोलीस स्टेशनला माहिती देऊन धाड येथे शासकीय रुग्णालयात उपचार करून आरोपी पंढरी मधुकर मान्टे यांच्यावर धाड पोलिसानी कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.