मधमाश्यांच्या हल्ल्यात पाच महिलांसह एक युवक जखमी

By Admin | Updated: February 7, 2015 02:18 IST2015-02-07T02:18:32+5:302015-02-07T02:18:32+5:30

पिंप्री गवळी येथील घटना; कापूस वेचणीचे काम सुरु असताना अचानक झाला मधमाश्यांच्या हल्ला.

A young man, along with five women, was injured in a bee attack | मधमाश्यांच्या हल्ल्यात पाच महिलांसह एक युवक जखमी

मधमाश्यांच्या हल्ल्यात पाच महिलांसह एक युवक जखमी

पिंप्री गवळी (जि. बुलडाणा) : कापूस वेचणीचे काम सुरु असताना अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात पाच महिलांसह एक युवक जखमी झाला. घटना गावा तील अरुण क्षीरसागर यांच्या शेतामध्ये ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजेच्या सुमारास घडली.
मधमाश्यांच्या हल्ल्यात सविता अरुण क्षीरसागर, कामिनी शंकर गोरे, कौसाबाई मोरे, चंद्रभागाबाई क्षीरसागर, दगडाबाई क्षीरसागर या महिलांसह वासुदेव गोरे हा युवक जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नाना क्षीरसागर, संजय सुरळकर, भूषण शिंदे, गजानन क्षीरसागर, पवन कापसे यांनी शेतात धाव घेऊन जखमींना पिंप्री गवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत दाखल केले आहे. डॉ.पंकज पाटील यांनी जखमींवर उपचार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या कामिनी शंकर गोरे आणि वासुदेव गोरे या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: A young man, along with five women, was injured in a bee attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.