तुम्ही गाव दारूमुक्त करा; आम्ही हगणदरीमुक्त करतो

By Admin | Updated: June 2, 2015 02:26 IST2015-06-02T02:26:25+5:302015-06-02T02:26:25+5:30

हनवतखेड येथील महिलांनी घातले सीईओ मुधोळ यांना साकडे

You are free from the village; We're free from hart | तुम्ही गाव दारूमुक्त करा; आम्ही हगणदरीमुक्त करतो

तुम्ही गाव दारूमुक्त करा; आम्ही हगणदरीमुक्त करतो

अशेक इंगळे /सिंदखेडराजा : प्रत्येक गाव खेड्यात, वाडी- तांड्यावर गावठी तसेच देशी दारूचा महापूर असून, या दारूपायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. गाव हगणदरीमुक्त करण्यापेक्षा प्रथम दारूमुक्त करा, असा सवाल हनवतखेड येथील २00 महिलांनी जि.प.च्या सीईओ दीपा मुधोळ यांच्यासमोर केला.
हनवतखेड तीन हजार लोकवस्तीचे गाव असून, ग्रामसमृद्ध योजनेत या गावाने पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ ३0 मे रोजी हनवतखेड येथे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. जि.प. प्राथमिक शाळेत महिला व पुरुष मोठय़ा संख्येने उपस्थित होते; परंतु महिलांच्या मनातील खदखद वेगळीच होती.
यावेळी एका महिलेने तर चक्क प्रथम गावातील अवैध दारू विक्रीची दुकाने बंद करा, आम्ही गाव हगणदरीमुक्त करतो, असा प्रतिप्रश्न उपस्थित करून एकप्रकारे जिल्हा परिषद आणि पोलीस विभागाला आवाहन दिले. सिंदखेडराजाचे पोलीस गावात येतात, दारू विक्रेत्यांकडून हप्ते घेतात आणि निघून जातात, असाही आरोप एका महिलेने केला. लाहण्यापासून मोठय़ापर्यंत सर्वांनाच दारूचे व्यसन जडले आहे. संपूर्ण गाव व्यसनाधीन होत आहे. राजकीय नेते या विषयात हात घालत नाहीत. यावर आपण मार्ग काढावा, अशी विनंती महिलांनी केली.

Web Title: You are free from the village; We're free from hart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.