योगदिनात शासकीय कार्यालयांचा खोडा!

By Admin | Updated: June 22, 2015 02:08 IST2015-06-22T02:08:30+5:302015-06-22T02:08:30+5:30

खामगावात कर्मचा-यांची अनुपस्थिती, कार्यालयांना कुलूप.

Yoga! Dugout government offices! | योगदिनात शासकीय कार्यालयांचा खोडा!

योगदिनात शासकीय कार्यालयांचा खोडा!

खामगाव : आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना खामगावातील शासकीय कार्यालयांनी शासकीय अध्यादेशाला चक्क केराची टोपली दाखविल्याचे ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले. संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला होता. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या ही भारताने दिलेली देणगी आहे. या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेता, शासकीय कार्यालयांमध्ये योगदिन साजरा करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी १७ जून रोजीच्या अध्यादेशानुसार दिले. यासाठी प्रशिक्षण आवश्यक वाटल्यास शिक्षण विभागाकडून योग प्रशिक्षकांची मदत घेण्याचेही सुचविले होते; मात्र खामगावातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचार्‍यांनी योगदिनाला चक्क दांडी मारली. विविध कार्यालये चक्क सकाळी बंद होती. यामध्ये पशुवैद्यकीय लघु सर्वचिकित्सालय, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय बंद आढळून आले. त्यामुळे कर्मचार्‍यांनी योगदिनाला हरताळ फासल्याची चर्चा होत आहे.

Web Title: Yoga! Dugout government offices!