होय..आहेर स्वीकारल्या जाईल; पण रोख स्वरूपात!
By Admin | Updated: March 23, 2017 02:26 IST2017-03-23T02:26:54+5:302017-03-23T02:26:54+5:30
मुस्लीम कुटुंबाचा स्त्यूत्य हेतू; आहेराची रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांसाठी.

होय..आहेर स्वीकारल्या जाईल; पण रोख स्वरूपात!
सुधीर चेके पाटील
चिखली (जि. बुलडाणा), दि. २२- तोरणदारी होणार्या समारंभात आहेर देण्या-घेण्याच्या प्रथेचे प्रस्थ आजही जपल्या जाते. या प्रथेला छेद देण्याचाही प्रयत्नदेखील होत असून हल्ली अनेक लग्नपत्रीकांमध्ये आहेर स्वीकारल्या जाणार नाही, अशी टीप टाकण्यात येते; मात्र ह्यकेवळ रोख आहेर स्वीकारण्यात येतीलह्ण अशी टीप असलेली एक लग्नपत्रिका यास अपवाद ठरली असून या माध्यमातून जमा होणारी रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूबांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली जाणार आहे.
तालुक्यातील धोत्रा नाईक येथील प्रतिष्ठीत नागरीक रहीम खॉ यांची मुलगी आसमा हीचा विवाह जानेफळ ता.मेहकर येथील शे.अफजल शे.कठ्ठ यांचा मुलगा शे.सलमान यांच्यासोबत २ मे रोजी धोत्रा नाईक येथे आयोजित करण्यात आला आहे. या लग्नानिमित्त हिंदु पध्दतीने छापण्यात आलेली लग्नपत्रीका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या लग्नात आलेल्या आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रमंडळींनी आहेर करायचे असल्यास ते रोख पैशाच्या स्वरूपातच करावे, कारण ती रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली जाणार असल्याची विशेष टीप या पत्रीकेत टाकण्यात आली आहे.
सोबतच या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देणारी लग्नपत्रिका सामाजिक संदेश देणारी असावी, हा हेतू देखील रहीम खॉ यांनी साध्य केला आहे. तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांचे निष्ठावंत मुस्लीम मावळय़ांची यादी तपशिलासह प्रसिध्द करून छत्नपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लीम सरदार होते. तेव्हा आपणही शिवरायांचा हा वारसा जोपासावा, असा संदेश या पत्रिकेतून दिला आहे. सोबतच स्त्रीभृणहत्या टळण्यासाठी 'भाऊराया वाचव रे' ही कविता आणि पाण्याचे महत्त्व विषद करणारी तसेच ह्यपाणी वाचवाह्ण हा संदेश देणार्या ओळी देखील या लग्नपत्रिकेत आंतभरुत करण्यात आल्या आहेत.