येळगावांत हाणामारी

By Admin | Updated: June 25, 2017 09:23 IST2017-06-25T09:23:01+5:302017-06-25T09:23:01+5:30

रस्त्यावर मुरुम टाकण्याच्या कारणातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २३ जून रोजी घडली

Yelagavant Phantagarh | येळगावांत हाणामारी

येळगावांत हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तालुक्यातील येळगाव येथे शेतातील रस्त्यावर मुरुम टाकण्याच्या कारणातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २३ जून रोजी घडली. या प्रकरणी आकाश परशुराम गुळवे (१९) याने शहर पोलिसात फिर्याद दिली की, आरोपी भगवान नारायण साळोख (४५), अमोल भगवान साळोख(२५) व शेषराव देवराव साळोख(५५) यांनी शेतातील रस्त्यावर मुरुम टाकण्याच्या कारणातून घरात घुसून आरोपी भगवान साळोख याने हात व गच्ची पकडून ठेवली, तर आरोपी अमोल साळोख याने उजव्या हातावर ब्लेड मारुन जखमी केले, तसेच जातीवाचक शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. यावरुन तिन्ही आरोपी विरुद्ध कलम ३२४, ४५२, ३२३, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Yelagavant Phantagarh