यंदा खताची टंचाई नाही
By Admin | Updated: May 7, 2015 01:19 IST2015-05-07T01:19:38+5:302015-05-07T01:19:38+5:30
खरीप हंगामाच्या दृष्टिने काळाबाजारावर अंकुश; शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न.

यंदा खताची टंचाई नाही
बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. २0१५-१६ च्या खरीप हंगामात ५७ हजार ५00 मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी मंजूर करण्यात आली. त्यापैकी गत वर्षीचे आणि चालू वर्षाचे असे २२ हजार ४१८ मेट्रिक टन रासायनिक खत सध्या उ पलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्यांना ख ताची टंचाई भासणार नाही.
शेतकर्यांची खरीप हंगामासाठी जोरदार तयारी सुरू असून, शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शिवाय काही ठिकाणी पिकांची लागवडही सुरू आहे. िपकांसाठी आवश्यक रासायनिक खतांची उपलब्धता सध्या तरी कमी आहे. येत्या काही महिन्यांत खतपुरवठय़ात वाढ होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे; मात्र सध्या खताची कमतरता शेतकर्यांसाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते, हेही तेवढेच खरे. ही बाब लक्षात घेऊन व्यापारीही चढय़ा भावाने खतविक्री करीत शे तकर्यांना लुबाडणूक होण्याची शक्यत आहे. यावर्षी कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी ७.४२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे या हंगामासाठी १ लाख ७0 हजार मेट्रिक टन रासायानिक खताची मागणी करण्यात आली होती. यातून ५६ हजार ५00 मेट्रिक टन खत उपलब्ध झाले, तर गतवर्षीचा उपलब्ध साठा आणि यंदा प्राप्त २२ हजार ४१८ मेट्रिक टन रासायनिक खत उ पलब्ध आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. शिवाय हंगामाच्या मध्यपर्यत मागणीनुसार खतसाठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.