यावर्षी १२८0 पीक प्रात्यक्षिके
By Admin | Updated: May 8, 2017 02:33 IST2017-05-08T02:33:05+5:302017-05-08T02:33:05+5:30
अन्न सुरक्षा योजना; गतवर्षी नऊ हजार शेतक-यांनी घेतला सहभाग.

यावर्षी १२८0 पीक प्रात्यक्षिके
बुलडाणा : कुठल्याही एका पिकांवर अवलंबून न राहता, एकाच शेत जमिनीवर दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके घेऊन जास्तीजास्त उत्पन्न घेता येते. या उद्देशाने सोयाबीनबरोबर तूर, किंवा कापसाबरोबर मूग वा उडीद, अशी पिके शेतकर्यांकडून घेतली जात आहेत. जिल्ह्यात २0१६-१७ यावर्षी जिल्ह्यात जवळपास नऊ हजार शेतकर्यांनी अशी प्रात्यक्षिके केली आहेत, तर २0१७-१८ या हंगामात १२८0 प्रात्यक्षिके करण्याचे प्रास्तावित करण्यात आले आहे.
पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा व घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न शेतकर्यांना खात्रेशीर मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबविले जात आहे. यातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके) अंतर्गत तूर, मूग, हरभरा या कडधान्य पिकांची उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. या अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, अनुदानाद्वारे प्रमाणित बियाणे पुरवठा, एकात्मिक मुलद्रव्ये व्यवस्थापन तसेच अवजारे पुरवठा या घटकांचा अंतर्भाव होता.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके) हे अभियान २0१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविण्यात आले. यात सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनु. जमातीमधील १ लाख ६ हजार ४८२ शेतकर्यांनी यात सहभाग घेतला आहे. यात एका पिकांवर अवलंबून न राहता, एकाच हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ५00 शेतकर्यांनी शेत जमिनीवर आंतरपट्टी व आंतरपिके घेतली आहेत. यात ८0 पीक प्रात्यक्षिके करण्यात आली.