काेल्ही गवळी येथील यात्रा महाेत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:18+5:302021-04-25T04:34:18+5:30

मराठवाडा, खान्देश व विदर्भाच्या सीमेवर वसलेले श्री महाबळेश्वर महाराज संस्थान सर्वत्र परिचित आहे़ अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या ...

Yatra festival canceled at Kalhi Gawli | काेल्ही गवळी येथील यात्रा महाेत्सव रद्द

काेल्ही गवळी येथील यात्रा महाेत्सव रद्द

मराठवाडा, खान्देश व विदर्भाच्या सीमेवर वसलेले श्री महाबळेश्वर महाराज संस्थान सर्वत्र परिचित आहे़ अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री महाबळेश्वर महाराज नवरात्र उत्सव व यात्रा अतिशय मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाताे़ दूरवरून लोक चैत्र पौर्णिमेला हजारोच्या संख्येने सहभागी होतात़ पण गेल्या वर्षीसारखे यंदाही कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार जनतेच्या हिताचा व आरोग्याचा विचार करून लोकांचा समूह व जमाव एकत्र येऊ नये म्हणून चैत्र पौर्णिमा आरती व यात्रा रद्द करण्यात आली आहे़ भक्तांनी सार्वजनिक हिताचा व आरोग्याचा विचार करून बाहेरून दर्शनासाठी येऊन जमाव करू नये, असे आवाहन श्री महाबळेश्वर महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Yatra festival canceled at Kalhi Gawli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.