यशाेमती ठाकूर यांनी साधला बालकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST2021-01-24T04:16:49+5:302021-01-24T04:16:49+5:30

बुलडाणा : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शनिवारी बुलडाणा येथील मुलांचे बालगृह व निरीक्षणगृहाला भेट ...

Yashamati Thakur interacted with the children | यशाेमती ठाकूर यांनी साधला बालकांशी संवाद

यशाेमती ठाकूर यांनी साधला बालकांशी संवाद

बुलडाणा : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शनिवारी बुलडाणा येथील मुलांचे बालगृह व निरीक्षणगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी इमारतीमधील विविध कक्षांची पाहणी केली. तसेच बालगृहातील सध्या प्रवेशित मुलांशी चर्चा केली. बालगृहात मागे झालेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी प्रवेशित असलेल्या मुलांकडून त्यांनी सत्कार स्वीकारला.

यावेळी त्यांच्यासमावेत जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जि.प. सदस्य जयश्री शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) रामरामे, महिला व बालविकास अधिकारी सोनुने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मराठे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Yashamati Thakur interacted with the children