गळफास लावून इसमाची आत्महत्या

By Admin | Updated: April 13, 2017 13:13 IST2017-04-13T13:13:25+5:302017-04-13T13:13:25+5:30

चिखली रोडवरील विश्वास नगर येथे एका इसमाने राहत्या घरी गळफासलावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी वाजता उघडकीस आली.

Yama's suicide by hanging | गळफास लावून इसमाची आत्महत्या

गळफास लावून इसमाची आत्महत्या

बुलडाणा: चिखली रोडवरील विश्वास नगर येथे एका इसमाने राहत्या घरी गळफास
लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी वाजता उघडकीस आली.
विश्वास नगर येथील रहिवासी गणेश सुखदेव गारडे (वय ४२) यांचे कुटुंबीयांचा
खानावळीचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते पहाटे चार वाजता स्वयंपाकासाठी
उठतात. गुरूवारी पहाटे चार वाजता उठल्यानंतर गणेश गारडे गॅलरीमध्ये गेले
व दरवाजा बंद केला. दररोजप्रमाणे ते गॅलरीतून बाहेर आले नसल्यामुळे
कुटुंबीयांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला.
त्यामुळे संशय आल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. तर गणेश गारडे यांनी गळफास
लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सुखदास रामदास लहाने यांच्या
तक्रारीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Yama's suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.