जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बंधारा चुकीच्या ठिकाणी
By Admin | Updated: March 18, 2017 01:05 IST2017-03-18T01:05:21+5:302017-03-18T01:05:21+5:30
लघुसिंचन विभागाचा प्रताप; पाणी साठविणे अशक्य, पैशांचा अपव्यय.

जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बंधारा चुकीच्या ठिकाणी
नवीन मोदे
धामणगाव बढे (जि. बुलडाणा), दि. १७- जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट बांधांच्या कामाचा ह्यले-आउटह्ण तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आला आहे. त्यामुळे पाणी साठविणे शक्य होणार नसून, पैशांचा अपव्यय होत आहे.
शेतकर्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासन जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. या योजनेंतर्गत भाग नं.२ मध्ये शेषराव श्यामराव बढे यांचे गट नं.४७३ या शेतानजिक ह्यले-आउटह्ण तांत्रिकदृष्ट्या चुकीचा टाकण्यात आला. यावेळी संबंधित शेतकर्यास विश्वासात घेण्यात आले नाही. चुकीच्या ह्यले आउटह्ण मुळे पाण्याचा प्रवाहदेखील बदलणार आहे. या सिमेंट बंधार्याचे काम मोठय़ा प्रमाणात पूर्ण झाले आहे. बांधकाम झाल्यानंतर संबंधित शेतकर्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे लघुसिंचन विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चुकीच्या ह्यले-आउटह्ण मुळे दोन्ही बाजूच्या शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे लघुसिंचन विभाग आपल्या कामाबाबत किती गंभीर आहे, याची कल्पना येते.
पाणी मुरेल की पैसा ?
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत धा.बढे येथील नदीवर कोट्यवधीची कामे सुरु आहे; मात्र ही कामे नियमानुसार होत नाहीत. नफ्यामध्ये सरळ भागीदारी काहींना देण्यात येत असल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ह्यपाणी मुरेल की पैसाह्ण हा प्रश्न जनतेस पडला आहे.
या ठिकाणी टाकलेला ह्यले -आउटह्ण तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे. ही बाब संबंधित विभागाच्या अधिकार्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनीदेखील हे मान्य केले; परंतु संबंधित शेतकर्यांच्या नुकसानास जबाबदार कोण, हा खरा प्रश्न आहे.
- संजय बढे
काँग्रेस कार्यकर्ता, धा.बढे.