कामगारांचे बेमुदत उपोषण
By Admin | Updated: December 24, 2015 02:37 IST2015-12-24T02:37:22+5:302015-12-24T02:37:22+5:30
दखल न घेतल्याने कामगार आक्रमक

कामगारांचे बेमुदत उपोषण
मलकापूर (जि. बुलडाणा) : सतत चार दिवस साखळी उपोषण करूनही सुतगिरणी प्रशासनाने या आंदोलनाची दखलही न घेतल्याने २३ डिसेंबरपासून माजी नगराध्यक्ष तथा सुतगिरणीचे भागधारक दिलीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सुतगिरणी वर्कस युनियनच्यावतीने सुरु केलेले बेमुदत उपोषण २३ रोजी पाचव्या दिवशीही सुरुच होते. गत वर्षभरापासून बंद असलेली हुतात्मा वीर जगदेवराव सुतगिरणी तात्काळ सुरू करण्यात यावी या मागणीस्तव, सुतगिरणी वर्कस युनियनच्यावतीने तहसील चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण मंडपास बुधवारी दुपारी बुलडाण्याचे कामगार अधिकारी महल्ले यांनी उपोषणकर्त्या कामगारांची प्रत्यक्ष भेट घेतली. उपोषणकर्त्यांशी झालेल्या चर्चे दरम्यान सुतगिरणी प्रशासनाला सुतगिरणी सुरू करण्यासंदर्भात पारीत करण्याचे आश्वासन कामगार अधिकारी महल्ले यांनी दिले. मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात सुतगिरणी सुरू होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. अशी भुमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.