समृद्धी महामार्गाच्या कामाची होणार आज पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST2021-03-15T04:30:53+5:302021-03-15T04:30:53+5:30

महाराष्ट्र दिनी नागपूर ते शिर्डीपर्यंतचा महामार्ग सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असल्याने कामाच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी ...

The work of Samrudhi Highway will be inspected today | समृद्धी महामार्गाच्या कामाची होणार आज पाहणी

समृद्धी महामार्गाच्या कामाची होणार आज पाहणी

महाराष्ट्र दिनी नागपूर ते शिर्डीपर्यंतचा महामार्ग सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असल्याने कामाच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा राबता वाढला आहे. सोमवारी सिंदखेडराजा व दुसरबीड जवळील समृद्धी महामार्गाच्या इंटर चेंज कामाची पाहणी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे हे सोमवारी सकाळी ११ वाजता येणार आहेत. समृद्धी महामार्गाचे दोन इंटर चेंज सिंदखेडराजा तालुक्यात आहेत. त्यातील एक सिंदखेडराजाजवळ देऊळगाव राजा रस्त्यावर आहे. तर अन्य एक इंटर चेंज दुसरबीडजवळ आहे. या दोन्ही ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा मेहकरकडे जाणार आहे. या पाहणी कामासाठी स्थानिक विभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, समृद्धीची जेई हिमांशू पाटील व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: The work of Samrudhi Highway will be inspected today