राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:17+5:302021-01-14T04:28:17+5:30
मेहकर : मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जन्मलेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारक्षम संगोपनात छत्रपती शिवाजी महाराज यांची जडणघडण ...

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे कार्य प्रेरणादायी
मेहकर : मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जन्मलेल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारक्षम संगोपनात छत्रपती शिवाजी महाराज यांची जडणघडण झाली व त्यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तसेच सिद्धपुरुष रामकृष्ण परमहंस यांच्या छत्रछायेत स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य उजळून निघाले. ते युवकांचे प्रेरणास्थान बनले. अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंती दिनी आपण त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे सतत स्मरण ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी केले.
१२ जानेवारी रोजी स्थानिक जिजाऊ चौक येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्याचे करण्यात आले. या वेळी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय जाधव होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये भास्करराव राऊत, ड्रायव्हर युनियनचे शिवाजी तुपकर, सागर कडभने, सुनील मोहळकर, मारोती जुनघरे, विनोद भिसे, द्वारकादास जमधाडे, गजानन नवघरे, मदन मुंदडा, वैभव शेळके, विक्की गंधिले, शुभम वानखेडे, ओम राऊत, शुभम कदम, भुवन ठाकूर, योगेश आराख, सोनू भदरके यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.