ग्रामस्थांनी तिस-यांदा बंद पाडले जिगाव प्रकल्पाचे काम
By Admin | Updated: April 12, 2016 01:32 IST2016-04-12T01:32:01+5:302016-04-12T01:32:01+5:30
घर व शेताचा मोबदला रखडला;

ग्रामस्थांनी तिस-यांदा बंद पाडले जिगाव प्रकल्पाचे काम
नांदुरा (जि. बुलडाणा): घर व शेतीचा रखडलेला मोबदला तत्काळ मिळावा या मागणीसाठी धरणस्थळी जावून आडोळ खुर्द येथील ग्रामस्थांनी ११ एप्रिल रोजी जिगाव प्रकल्पाचे काम बंद पाडले, असून यामुळे आज दिवसभर मजुरांचा ताफा बसून होता.
मागील तीन दशकांपासून रेंगाळलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सात वर्षापासून सुरू आहे. यावर्षी धरणाचा सांडवा व धरणाचे दरवाजे यांच्या पाया बांधकामाच्या कामाला पाटबंधारे विभागाने प्रारंभ केला. ११ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजेदरम्यान आडोळ खुर्द या गावातील शंभरावर प्रकल्पग्रस्तांनी घटनास्थळी जाऊन घराच्या व शेतीच्या मोबदल्यासाठी काम बंद पाडले.