मानवाधिकार संघटनेचे कार्य जनहिताचे : विजय साळवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST2021-02-05T08:33:54+5:302021-02-05T08:33:54+5:30
यावेळी उद्घाटक म्हणून रामा म्हस्के उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती गजेंद्र शिंगणे होते. मुख्य मार्गदर्शक डॉ.विजय साळवे, ...

मानवाधिकार संघटनेचे कार्य जनहिताचे : विजय साळवे
यावेळी उद्घाटक म्हणून रामा म्हस्के उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती गजेंद्र शिंगणे होते. मुख्य मार्गदर्शक डॉ.विजय साळवे, पीएसआय रेल्वे पोलीस भुसावळ, हि.रा.गवई, तर प्रमुख अतिथी रामदास वायाळ, बळीराम शिंगणे, अनंता इंगळे, प्रशांतभैया डोंगरदिवे जिल्हा अध्यक्ष व रमेश डोंगरे जिल्हा महासचिव भारतीय मानवाधिकार उपस्थित होते. यावेळी देऊळगाव मही ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांचा व पत्रकारबांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊत, रामा म्हस्के,अनंता इंगळे, आशीकभाई, मुस्लीमभाई, तसेच पत्रकार रामभाऊ पऱ्हाड, अक्तरभाई औरंगाबाद टाइम्स, हनिफभाई, प्रकाश साकला, संतोष जाधव, अमोल बोबडे, गजानन चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मानवाधिकारच्या देऊळगाव राजा तालुका अध्यक्षपदी संतोष कदम, महासचिवपदी नंदा झिने, उपाध्यक्षपदी संतोष टेकाळे, तर चिखली अध्यक्षपदी कल्पना केजकर, महासचिवपदी रईस शेख, मलकापूर तालुका अध्यक्षपदी राजू इंगळे, जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी खॉजा जावेद पटेल, शेगाव तालुका अध्यक्ष रवि इंगळे यांची नियुक्ती करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. संचलन जाकेरा बी शेख कलाम जिल्हा सचिव यांनी, तर आभार प्रदर्शन कल्पना केजकर यांनी केले.
----------------