महिलांचा घागर मोर्चा

By Admin | Updated: February 11, 2015 01:06 IST2015-02-11T01:06:58+5:302015-02-11T01:06:58+5:30

लोणार तालुक्यातील पारडी सिरसाट गावात पाणीटंचाईचे सावट; तहसीलदारांना घेराव.

Women's Swan Morcha | महिलांचा घागर मोर्चा

महिलांचा घागर मोर्चा

लोणार (बुलडाणा) : तालुक्यातील पारडी सिरसाट येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या त्रस्त महिलांनी १0 फेब्रुवारी रोजी कळशी, घागर घेऊन तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांना घेराव घातला. गत २ वर्षांपासून तालुक्यात दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर २५ वर्षांपासून पुनर्वसनामुळे शासकीय योजनेचा लाभ न मिळालेल्या पारडी सिरसाट येथील ग्रामस्थ गावातीलच शेतकरी मधुकर शंकर बाभुळवार यांच्या खासगी विहिरीवरून पाणी घेत होते; मात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी पारडी सिरसाट येथील महिलांनी तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे.

Web Title: Women's Swan Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.