महिला आरक्षणाचा अनेकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST2021-02-05T08:31:39+5:302021-02-05T08:31:39+5:30

चिखली : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींचे सन २०२० ते २०२५ या कालावधीचे महिला सरपंचपदाची सोडत नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी ...

Women's reservation hits many | महिला आरक्षणाचा अनेकांना फटका

महिला आरक्षणाचा अनेकांना फटका

चिखली : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींचे सन २०२० ते २०२५ या कालावधीचे महिला सरपंचपदाची सोडत नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय,बुलडाणा येथे २९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. यात अनुसूचित जातीसाठी १२, नागरिकांचा मागासप्रवर्ग १३ आणि सर्वसाधारण २४ याप्रमाणे जागा सुटल्या आहेत. महिला आरक्षणाचा अनेकांना फटका बसला आहे.

तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण २७ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात जाहीर केले होते. यातील महिला सरपंचपदाची सोडत नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे २९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये असोला बु., आंधई, भोगावती, हरणी, महिमळ, करवंड, अमडापूर, भानखेड, पिंपरखेड, किन्हीनाईक, तोरणवाडा, वैरागड अशा १२ ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी सोडत जाहीर झाली आहे. तर बेराळा, एकलारा, कोलारा, येवता, वळती, खैरव, मंगरूळ (ई), शेळगाव आटोळ, शिंदी हराळी, डोंगरशेवली, गुंजाळा, कोनड, व मेरा बु. या १३ ग्रामपंचातींसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला सोडत निघाली आहे. सावंगी गवळी, मनुबाई, मोहदरी, भोरसाभोरसी, भोकर, भालगाव, सातगाव भुसारी, काटोडा, मुंगसरी, अंत्री खेडेकर, खोर, टाकरखेड मु., सोमठाणा, उत्रादा, दहिगाव, नायगाव खु., खंडाळा मकरध्वज, करतवाडी, सावरगाव डुकरे, भरोसा, मुरादपूर, हातणी, केळवद, पळसखेड दौलत या २४ ग्रामपंचायतींत सर्वसाधारण महिलांसाठी सोडत निघालेली आहे.

Web Title: Women's reservation hits many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.