हगणदरीमुक्तीसाठी महिलांचा पुढाकार
By Admin | Updated: May 24, 2014 00:11 IST2014-05-23T23:53:11+5:302014-05-24T00:11:30+5:30
बुलडाणा पंचायत समितीअंतर्गत भादोला ग्रामपंचायतने ग्राम हागंदारी व दारुबंदीमुक्त करण्याचा संकल्प केला.

हगणदरीमुक्तीसाठी महिलांचा पुढाकार
बुलडाणा : निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हय़ात शौचालयाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हाभर गावागावात प्रबोधन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुलडाणा पंचायत समितीअंतर्गत भादोला ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस उपस्थित बहुसंख्य महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत हागंदारी व दारुबंदीमुक्त करण्याचा संकल्प केला. भादोला ग्रामपंचायत हागणदारीमुक्त करण्या बरोबरच ग्रामपंचायतीत दारुबंदीच्या ठरावाचाही विषय यावेळी महिलांनी उपस्थित केला व सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. नारीशक्तीने एकदा ठरविले तर निश्चितच गावाचा कायापालट होऊन गाव हे स्वच्छतेचे नंदनवन होऊ शकते असा संकल्प करीत भादोलावासी महिलांनी एकाच दिवसात महत्वपूर्ण निर्णय घेऊन जिल्हयासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.