मातृतीर्थ जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा लढा

By Admin | Updated: April 26, 2017 14:08 IST2017-04-26T14:08:42+5:302017-04-26T14:08:42+5:30

मातृतीर्थ राजमाता जिजामाता यांच्या जिल्ह्यात वर्धाजिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी याकरिता महिलांनी लढा द्यायलासुरूवात केली आहे.

Women's fight for drunkenness in Matrimthir district | मातृतीर्थ जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा लढा

मातृतीर्थ जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांचा लढा

बुलडाणा : मातृतीर्थ राजमाता जिजामाता यांच्या जिल्ह्यात वर्धा
जिल्ह्याप्रमाणेच संपूर्ण दारूबंदी व्हावी याकरिता महिलांनी लढा द्यायला
सुरूवात केली आहे.
  न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारूविक्री बंद
करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिलांच्या चळवळीला बळ मिळाले आहे. सरपंच
आणि ग्रामसेवक पैसे घेऊन दारू दुकानाला मान्यता देणारा ठराव पारीत करू
शकतात याकरीता सर्वांनी दक्ष राहून १ मे च्या ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव
पारीत करून घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रोडला लागून
असलेली दारूची दुकाने ५०० मीटर अंतरावर नेण्याचा महत्वपुर्ण निर्णय जाहीर
झाल्यामुळे मद्यविक्रेत्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला.
मातृतिर्थ बुलडाणा जिल्हा दारूबंदी अभियानवतीने नुकतीच सभा पार पडली
असून, या सभेत आता जिल्ह्यात  बंद झालेली दारूची दुकाने सुरू न होवू
देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या करीत असतांना,
उपासमारी, बेरोजगारी असे चित्र ग्रामीण भागात असताना दारूचे दुकान म्हणजे
संपूर्ण परिवाराची जीवंतपणीच आत्महत्या होय, असा सुर यावेळी सभेला
उपस्थित मान्यवर कॉम्रेड सुधीर देशमुख, शाहीर खांडेभराड, सतीश पाटील,
सोपान बिचारे, सुरेखाताई निकाळजे या सर्वांच्या मनोगतातून निघाला.
बैठकीला बुलडाणा जिल्ह्यातील दारूबंदी अभियानाचे सभासद संदिप काकडे,
शाहीर जयवंतराव गवई, योगेश कोकाटे, सुदाम हिवाळे, शाहीर प्रमोद दांडगे,
शाहीर इंगळे गुरूजी, पदमा जवरे, रेखा खरात, अमोल चव्हाण, विनोद धंदरे,
उषा लहाने, सुलोचना हसले, शोभा बिचारे, मनोरमा डोके, प्रमिला सुशिला,
गोकुळाबाई भातोकार, शिला इंगळे, रंजना सपकाळ, अजय जाधव, संजय मोरे, रवि
भोंडे, जनार्धन झांबरे, वासुदेव जवरे, अनुराधा भावसार, अकील शहा,
सावित्रीबाई मांडवगडे, हेमलता कांबळे, एस.बी.रूपने, नलिनीताई उन्हाळे
यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामुख्याने
उपस्थित होते. या सभेचे संचालन साहित्यिक अजय जाधव यांनी केले तर आभार
प्रदर्शन सतिष पाटील यांनी मानले. तसेच दारूमुळे मरण पावलेल्या
जिल्ह्यातील नागरिकांना सामूहीक श्रध्दांजली अर्पण करून, राष्ट्रगिताने
सभेची सांगता करण्यात आली.
(प्रतिनिधी)

Web Title: Women's fight for drunkenness in Matrimthir district