दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST2021-06-24T04:24:00+5:302021-06-24T04:24:00+5:30
डोमरुळ : परिसरातील माेंढळा परिसरात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेसह महिलांनी एल्गार करीत २३ जून ...

दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार
डोमरुळ : परिसरातील माेंढळा परिसरात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेसह महिलांनी एल्गार करीत २३ जून राेजी धाड पाेलीस स्टेशनमध्ये धडक दिली़ यावेळी विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदारांना देण्यात आले़
मोंढळा, डोमरुसह परिसरातील अनेक ठिकाणी गत काही दिवसापासून अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे़ गावागावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे तसेच वादही वाढले आहेत़ ग्रामस्थांसह महिलांना होणारा त्रास थांबविण्यासाठी अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी निवेदनात केली आहे़ निवेदनावर शिवसेनेचे धाड विभाग प्रमुख दिनेश काळे, युवासेना विभाग प्रमुख गणेश पालकर, संदीप पालकर तसेच मोंढळा येथील वनिता कैलास सपकाळ, छाया कृष्णा वाघमारे, वंदना वाघमारे, नंदा वाघमारे, सविता सपकाळ, मुक्ता काळे यांच्यासह अनेक महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाची वेळीच दखल न घेतल्यास बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनकर्त्यांनी निवेदनात केला आहे़