महिलांनी फोडल्या दारुच्या बाटल्या
By Admin | Updated: May 1, 2017 23:34 IST2017-05-01T23:34:06+5:302017-05-01T23:34:06+5:30
सावणा- ग्रामसभेनंतर उपस्थित सर्व महिलांनी गावातील अवैध दारू विक्री अड्ड्यांवर जाऊन तेथील दारूच्या बाटल्या फोडल्या.

महिलांनी फोडल्या दारुच्या बाटल्या
सवणा : येथील ग्रामपंचायती कार्यालयमध्ये महाराष्ट्रदिनी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नंदाबाई हाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेमध्ये ७०० महिलांच्या सह्यांचे निवेदन देऊन गावातील अवैध धंदे कायम वरुपी बंद करण्यात यावे, असा ठराव मांडून पारित करण्यात आला. ग्रामसभेनंतर सर्व महिला गावातील अवैध दारु विक्री अड्ड्यावर जाऊन तेथील दारुचे बाटल्या बाहेर काढून फोडल्या.
यावेळी जमलेल्या महिलांनी जुगार चालतो त्या ठिकाणवरील पत्ते फाडले व नंतर पोलीस स्टेशन चिखली यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्यामुळे तरुणांसह वृद्ध व लहान शाळकरी मुलं व्यसनाच्या आहारी गेले आहेत, यामुळे सामाजिक वातावरण खराब होत असून, अनेक संसाराची राखरांगोळी झाली आहे. यामुळे महिलांनी पुढाकार घेत, गावात अवैधधंदे चालविणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महिलांनी पोलिसांकडे करण्यात आली.
सकाळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामसभेचे वाचन २०१६-१७ चे वार्षिक अहवालास मंजुरात देणे, मागील वर्षीच्या धर्तीवर वृक्षलागवड करणे, ग्रामपंचायत कामकाजात महिलांचा सहभाग वाढविणे, गावातील अवैध दारुबंदी, वरली-मटका व जुगार बंद करणे, समृद्ध महाराष्ट्र जन कल्याण योजना प्रतीक्षा यादी बनविणे, १४ व्या वित्त आयोग आराखड्यास मंजुरात देणेबाबत, ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियान, विजय हिंमतराव भुतेकर अर्जानुसार शेतकऱ्यासह कर्जमाफी मिळणे व स्वामिनाथन आयोग लागू करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आले व तो ठराव केंद्र सरकार व राज्य सरकार यांना पाठविण्याचे ठरविण्यात आले आणि सवणा महसूल क्षेत्रात देशी दुकान, बिअर बार, वाइन शॉप यासारख्या दुकानास परवानगी देऊ नये, असे ठरविण्यात आले.